महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

नियम पाळा अन्यथा निर्बंध आणखी कठोर – केडीएमसी आयुक्त

कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवलीमध्ये वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि डीसीपी विवेक पानसरे यांनी अचानक भेटी देत पाहणी केली. यावेळी कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर लगेचच सील करण्याची कारवाई करण्यात आली.
कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सतत 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून कोवीडबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये या निर्बंधांचे पालन होताना दिसत नाहीये. त्यामुळे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे यांच्यासह कल्याणात गर्दीची ठिकाणे असणाऱ्या दुकाने आणि रेस्टॉरंटला अचानक भेट दिली. त्यामध्ये रामबाग मॅक्सी ग्राऊंडसमोर असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात सोशल डिस्टन्स आणि इतर नियम न पाळल्याप्रकरणी हे दुकान सील करण्याची कारवाई केली. तसेच गोविंदवाडी येथील एका नामांकित हॉटेलमध्येही आयुक्त डॉ. सूर्यवंशी आणि डीसीपी पानसरे यांनी भेट दिली.
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरीत्या वाढू लागले आहेत. मात्र त्यानंतरही काही दुकाने आणि रेस्टॉरंटमध्ये कोवीड नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आम्ही आज अचानक हा पाहणी दौरा केल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष पथके बनवण्यात आली असून ही पथके दररोज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच लोकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्क घालणे बंधनकारक असून तसे न झाल्यास येत्या काळात निर्बंध आणखी कठोर करण्याचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »