DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पालिका हद्दीतील मौजे गाळेगांव येथील स्थानिक रहिवासी गुरुनाथ हनुमंत पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली पारंपरिक मासेमारीची होडी थेट नदीपात्रात वळवली. एकीकडे विस्तारलेले नदीपात्र, त्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह. मात्र आपल्या जिद्दीच्या आणि अनुभवाच्या जोरावर या दोघांनीही जीवाची बाजी लावत समोरचा किनारा गाठला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या तिघांच्याही जीवात जीव आला. आपल्या पारंपरिक होडीद्वारे पवार पिता पुत्राने या तिन्ही व्यक्तींना नदीच्या प्रचंड प्रवाहातून सुखरुप बाहेर काढले.
या घटनेने परिसरातील नागरिकांकडून बाप लेकांचे कौतुक केले जात आहे,या घटनेची माहिती मिळताच या धाडसी कार्याबददल कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडून गुरुनाथ हनुमंत पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार यांचा आज सायंकाळी तहसील कार्यालयात शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सत्कार केला.यावेळी नायब तहसीलदार आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.