महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, २१ प्रवाशी जखमी

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे/प्रतिनिधी – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 70 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स तोल गेल्याने,पलटी झाली.सुदैवाने यात जिवीतहानी टळली असून एका चार वर्षीय मुलीच्या हाताला जबर दुखापत झाल्याची घटना घडल्याची देखील माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पुण्याहून उत्तरप्रदेश कडे जाणाऱ्या यूपी 55 एटी 1893 क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्सचा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील नरडाणा गावापासून काही अंतरावर तोल गेल्याने अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.

या ट्रॅव्हल्स मध्ये 70 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली असुन या घटनेत २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नरडाणा पोलीसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून जखमी झालेल्या प्रवासांना धुळे जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झालेल्या ट्रॅव्हल्स मधील प्रवासींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवीत हानी टळली असून एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली तर 21 प्रवासी किरकोळ जखमी झाले घटनास्थळी महामार्ग पोलीसांकडून देखील मदतकार्य सुरु आहे. प्रवासींचा सामान मोठ्या ट्रॅव्हल्सच्या वर ठेवण्यात आल्याने ट्रॅव्हल्सने झोल घेत पलटल्याने घटना घडली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »