महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू असताना शेतकऱ्यांचा राडा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी १० कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण मुरबाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या भूसंपादनाला काही शेतकाऱ्यांचा विरोध आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष्य करण्यात आले आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचा सर्व्हे सुरू असताना कल्याण तालुक्यातील आंबिवली गावातील काही शेतकाऱ्यांनी याचा विरोध केला. शेतकऱ्यांचा गोंधळ घालत हा सर्वे बंद पाडला. तब्बला अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं.कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गात काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी त्याचबरोबर राहतं घर बाधित होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी या संदर्भात हरकती नोंदवल्या आहेत. मात्र या हरकतींवर कोणत्याही प्रकारची सुनावणी न करता जमिनीचा अधिकाऱ्यांकडून सर्व्हे सुरू करण्यात आला. तसेच भूसंपादनासाठी नोंदवलेल्या हरकती संदर्भात सुनावणी घेण्यात यावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्याचबरोबर उल्हास नदीच्या बाजूला सरकारी जमीन असताना आमची जमीन भूसंपादित करून आमचं आयुष्य, जीवन उद्ध्वस्त का करता? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकाऱ्यांनी घातलेल्या गोंधळानंतर भूमिका अधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकाऱ्यांच्या हरकती आहेत त्यांच्या जमिनीचा भूसंपादनासाठी कोणत्याही प्रकारचा सर्व्हे केला जाणार नाही, ज्यांच्या हरकती नाहीत त्यांच्या जमिनीचा भूसंपादनासाठी सर्वे केला जाईल अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

Related Posts
Translate »