महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

तुर्की बाजरीचे पिक घेऊन शेतकऱ्याने साधली आर्थिक किमया

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे/प्रतिनिधी – धुळे तालुक्यातील बोरीस येथील शेतकरी अनिल जैन यांनी तुर्की देशी वाण ही उन्हाळी बाजरीची पेरणी करून यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. एक एकर मधून 30 क्विंटल बाजरीचे उत्पादन त्यांनी घेतले असून सध्या ही तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकऱ्यांनी अनिल जैन यांच्या शेतात गर्दी करीत आहेत.

खानदेशातील बोरीस हे गाव सती मातेच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील शेतकरी अनिल जैन हे सध्या तुर्कीच्या बाजरीमुळे तालुक्यात चांगलेच चर्चेत आले असून त्यांनी तुर्की देशी वाण बाजरीचा जानेवारी महिन्यात पेरा केला होता. ही बाजरी आता काढणीस आली असून डॉक्टर अनिल जैन यांनी दहा एकर शेतात विविध प्रयोग करत यंदा या बाजरीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यावर्षी त्यांनी तुर्की देशातील बाजरीची बियाणे मिळविले. या बाजरीची उंची 10 ते 11 फुटांपर्यंत वाढली असून यात 3 फुटांपेक्षा अधिक लांबीची कणसे आली आहेत. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे यामुळे त्यांना एका एकर मध्ये 30 क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित असून चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या बाजरीची विक्री होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

एका एकरमागे 12 लाख रुपयांचे उत्पादन त्यांना अपेक्षित असून ही तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी, अनिल जैन यांच्या शेतात होत आहे. शेतात आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी विकसनशील व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. मात्र अनिल जैन यांनी कृतीतून आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून इतर शेतकऱ्यांनी देखील या माध्यमातून विकसनशील प्रयोग करावेत असे आवाहन अनिल जैन यांनी केले आहे.

यंदा अतिवृष्टीमुळं धुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं गहू, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी बाजरी काळी पडली आहे, परिणामी त्याची विक्री होत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पावसाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, मोराणे (उत्तर प्रदेश) आदी भागांतून बाजरी विक्रीसाठी महाराष्ट्रात येत आहे. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिक, शहरी भागातील चाकरमान्यांकडून बाजरीला मोठी मागणी आहे. या बाजरीला सध्या दोन हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »