नेशन न्यूज मराठी टीम.च
नवी मुंबई / प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या आगमनाची वाट पाहता पाहता त्यांच्या विसर्जनाची वेळ देखील जवळ येवून ठाकते. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने देखील विसर्जन सोहळ्यासाठी आपली कंबर कसली. नवी मुंबई शहरामध्ये आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन वाचत गाजत करण्यात आले.
विसर्जनाच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण प्रकारच्या सोयी सुविधा गणेश भक्तांना उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून रस्ते देखील बंद करून वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला होता. सानपाडा, जुईनगर, नेरूळ ,बेलापूर ,घनसोली, कोपरखैरणे अशा विविध ठिकाणी कृत्रिम तलावाचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आलेले होते. तसेच निर्माल्यासाठी कलशाचे तसेच इतर कचऱ्यासाठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आलेली होती. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले आहे.



