महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक -आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली असून देशाच्या विकासासाठी मतदार हे महायुतीच्याच बाजूने उभे राहतील असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड विकासकामे ही जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचे सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त करत देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहनही आमदार भोईर यांनी यावेळी केले.

तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे. तो अधिकार आपण सर्वांनी बजावावा आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली विश्वनाथ भोईर, भाऊ प्रभूनाथ भोईर, सुप्रिया प्रभूनाथ भोईर, वैभव विश्वनाथ भोईर आणि विशाखा रुपेश भोईर या सर्व कुटुंबीयांनीही आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.

Related Posts
Translate »