नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – उत्तर प्रदेशच्या एका मुजफ्फरनगरच्या खाजगी – शाळेतील शिक्षकाने एका मुस्लिम मुलाला उभा करून शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांना त्याला मारायला सांगितलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महेश तपासे म्हणाले कि, त्या पिडीत विद्यार्थ्यांचा दोष काय होता तर तो फक्त मुस्लिम आहे त्याच्या सोबत हि घटना घडली का? भारतीय राज्यघटना अशा प्रकारच्या कुठल्याही पद्धतीने शिक्षा करण्यास अनुमती देत नाही. शाळा प्रशासन देखील देत नाही. ज्या पद्धतीने जातीय धार्मिक विष या मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या राजवाटीमध्ये देश पातळीवर एवढा खालपर्यंत पोचले आहेत त्याच्यामुळे घटना घडत आहे. आज देश चंद्रावर जरी पोहचलेला असला तरी मनुवादी मानसिकता काही लोकांची बदलत नाही. उत्तर प्रदेश प्रशासनाने त्या शिक्षकावर कडक कारवाई केली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.



