महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

महावितरणच्या उच्चदाब ग्राहकांकडून ४० लाखांची वीजचोरी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या कल्याण परिमंडलात उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात संचालन व दुरुस्तीतील (O&M) अभियंते व कर्मचारी कार्यरत आहेत. उच्चदाब ग्राहकांच्या वीज वापराचे तांत्रिक विश्लेषण आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार ही पथके तपासणी व वीजचोऱ्या शोधण्याचे काम करणार आहेत. या पथकांनी गेल्या तीन दिवसात टिटवाळा, डोंबिवली आणि विरारमध्ये सुमारे ४० लाख रुपयांच्या चार वीजचोऱ्या पकडल्या आहेत.

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून कल्याण परिमंडलातील कल्याण एक, कल्याण दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालय स्तरावर दहा पथके निर्माण करण्यात आली आहेत. या पथकांनी त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली असून गेल्या तीन दिवसात ४० लाखांच्या चार वीजचोऱ्या उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. टिटवाळा उपविभागातील गुरवली पाडा येथील जीन्स वाशिंग कंपनीत सर्व्हिस वायरला टॅपिंग करून विकास बबन दळवी या ग्राहकांने तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे पथकाने उघडकीस आणले आहे. संबंधित ग्राहक व वीज वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती यांना वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे. तर कल्याण पूर्व उपविभाग तीनमधील आरएल झोन येथील पेंढारकर कॉलेजजवळच्या आदर्श स्वीट मार्टमध्ये मीटरमध्ये फेरफार करून सुरू असलेली ७ लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याप्रकरणी ग्राहक गिरीश व अल्पेश चौधरी आणि वीज वापरकर्ता बाबूलाल चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.

डोंबिवलीतील बाजीप्रभू शाखा कार्यालयांतर्गत लेडीज गारमेंट शॉपच्या मीटरमध्ये छेडछाड करून २ लाख ८८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे पथकाने उघडकीस आणले. याप्रकरणी ग्राहक सुरेश महादू पाटील आणि वीज वापरणार चेतन मोहन गाला यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. तर विरारमधील चंदनसार परिसरात हेअर क्लिप बनवणाऱ्या कारखान्याची ३ लाख ३७ हजार रुपयांची वीजचोरी पथकाच्या तपासणीत समोर आली. याप्रकरणी कारखानाचालक कृष्णा मधूकर पाटील यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »