महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित


नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. १३ मार्चपर्यंत कल्याण परिमंडलात सुमारे ९ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी व नियमानुसार जीएसटीसह पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून संभाव्य गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या कल्याण परिमंडलातील ३ लाख २० हजार ३०१ ग्राहकांकडे १९१ कोटी ११ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ५० हजार ५१४ ग्राहकांकडे २८ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी असून १ हजार १९१ थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित केला आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत ९६ हजार ९४८ ग्राहकांकडे ६८ कोटी ६१ लाख रुपयांचे वीजबिल थकित असून ३ हजार ६३३ जणांची वीज खंडित केली आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख १० हजार २३९ ग्राहकांकडे ५० कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी असून ३ हजार ३९७ जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तर पालघर मंडलातील ६२ हजार ६०० ग्राहकांकडे ४४ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे व ५७४ जणांची वीज खंडित करण्यात आली आहे.

वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी रविवार आणि इतर सुट्टींच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरकडून करण्यात येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »