DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचे निर्देशानुसार, समग्र शिक्षा अंतर्गत इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमाअंतर्गत आज जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पृथ्वी दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत निसर्गास अनुकूल पर्यावरण विषयक संवर्धन होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता विकसित करण्यासाठी शाळा स्तरावर शाळेच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पती झाडे झुडपे, सूचीबद्ध करण्यासाठी आणि त्यांची ओळख होण्यासाठी उपलब्ध वनस्पतीची माहिती एकत्र करून त्याचे क्यूआर कोड तयार करणे व त्याची माहिती संकलित करून विद्यार्थी क्यूआर कोड असलेली लेबल्स झाडांना चिकटवतील ज्यामुळे शाळेच्या परिसरात असलेल्या कोणालाही वनस्पती स्कॅन करणे आणि त्याबद्दल माहिती जाणून घेणे सोपे होईल. या उपक्रमाची सुरुवात आज पासून करण्यात आलेली आहे.
डिजिटल साधने आणि पर्यावरणीय शिक्षण एकत्रित करून हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांचे निसर्गाबद्दलचे ज्ञान समृद्ध करणार नाही, तर त्यांची तांत्रिक कौशल्य देखील वाढवेल. हे सर्व मिशन लाईफच्या व्यापक उद्दिष्टांना पाठिंबा देणारे आहे हा साधा पण प्रभावी प्रकल्प एक मॉडेल म्हणून काम करेल जो नवोपक्रमाद्वारे पर्यावरण जागरूकता वाढवण्यास मदत करेल.