महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कोतवाल परिक्षेत आढळला डमी परीक्षार्थी, डमी परीक्षार्थ्याला अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाण्यात कोतवाल पदाच्या परीक्षेसाठी डमी परीक्षार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डमी परीक्षार्थी व मूळ परीक्षार्थीवर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून डमी परीक्षार्थी याला अटक करण्यात आले आहे. तर डमी परीक्षार्थी बसवणारा मूळ परीक्षार्थी फरार आहे. अटक करण्यात आलेला डमी परीक्षार्थी हा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील राजेवाडी येथील विजयसिंह महासिंह सुंदरडे येथील आहे. तर मूळ परीक्षार्थी मेहकर येथील गणेश हा फरार आहे.

चिखली रोड वरील सहकार विद्या मंदिर या परीक्षा केंद्रावर परीक्षा देतांना डमी परीक्षार्थी विजयसिंह महासिंह सुंदरडे याच्या हालचालीवर परीक्षा पर्यवेक्षक मनोज जगताप यांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली असता त्याने बनियानमध्ये खिसा शिवून त्यात मोबाइल लपवून आणल्याचे समोर आले होते. तेव्हा त्याचे हॉल टिकीट तपासले असता त्या हॉल तिकिटावर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो दिसून आला. दरम्यान याबाबतीत बुलढाणा शहर पोलिसात डमी परीक्षार्थी विजयसिंह व मूळ परीक्षार्थी गणेश या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय जयसिंग राजपूत करीत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »