महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन

प्रतिनिधी.

डोंबिवली – वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात  डफली बजाव आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवण्यास तयार नाही. या टाळीबंदीमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महाराष्टातील एसटी सेवा व महानगरातील बससेवा खुल्या झाल्या पाहिजेत. एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमारी होत आहे या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी पक्षप्रमुख ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यभरात “डफली बजाव आंदोलन करण्यात आल्याचे ठोके यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात क.डो.जि संघटक मिलिंद साळवे, ठाणे जिल्हा सचिव रेखाताई कुरवारे,भारतीय बौद्ध महासभा डों.अध्यक्ष गौतम सुतार,सम्यक विद्यार्थी आंदोलन ठा.जि.अध्यक्ष प्रतिक साबळे,उपाध्यक्ष  राजू काकडे,महासचिव  बाजीराव माने,सचिव नंदू पाईकराव,संघटक अर्जुन केदारे,वार्ड अध्यक्ष  विलास मोरे (इंदिरा नगर),उपाध्यक्ष  विजय इंगोले (इंदिरा नगर),महासचिव  संतोष खनदरे (इंदिरा नगर),प्रभारी महासचिव आनंद जावळे,संघटक अर्जुन केदारे, कार्यकर्ते -सुनिल पाचपुंजे, वार्डअध्यक्ष राहुल पांडवीर (आयरेगाव) रामकिसन हिंगे, योगेश सुतार, गणेश गायकवाड, रवी इंगोले, अशोक गायकवाड राजरत्न पांडवीर, निलेश कांबळे, राजू खरात आदी उपस्थित  होते.

Translate »
×