नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमधील व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये लेव्ही प्रश्नी वाद सुरू असल्याने कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मुख्य आवारापेक्षाही उपबाजार असलेले विंचूर येथे एप्रिल महिन्यामध्ये कांद्याची आवक 80 टक्के एवढी झाली आहे.
उपबाजार विंचूर येथे कांद्याची 3 लाख 40 हजार 242 क्विंटल ची आवक झाली तर लासलगाव मुख्य आवार येथे जुने व्यापारी लिलावात नसल्याने 79 हजार 868 क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी झाली तर उपबाजार विंचूर येथे 72 हजार 693 क्विंटल धान्याची आवक झाली लासलगाव येथे धान्य व्यापारी लिलावात सहभागी न झाल्या लिलाव बंद आहे. अशी माहिती माजी सभापती व विद्यमान संचालक, लासलगाव बाजार समिती यांनी दिली आहे.



