महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

छत्रपती संभाजी नगर मध्ये २५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त,तिघांना बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम.

संभाजीनगर/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाचा  अहमदाबाद विभाग आणि गुजरात पोलीसांची अहमदाबाद गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे  महसूल गुप्तचर संचालनालयाने शुक्रवार, 20.10.2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी  कायदा 1985 अंतर्गत शोधमोहीम राबवली. नंतर औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही या कारवाईत सहकार्य केले.

यातील एका आरोपीच्या निवासी परिसराची झडती घेतल्यावर सुमारे 23 किलो कोकेन, सुमारे 2.9 किलो मेफेड्रोन आणि  30 लाख रुपये मूल्याच्या भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या .

पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त करण्यात आले.

या अंमली आणि मनोविकृतीकारक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किमत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची नोंद केली गेली आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी  कायदा 1985 (NDPS 1985) च्या संबंधित तरतुदींनुसार हे सर्व पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार मुख्य सूत्रधारासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिककारखान्यांचा गैरवापर ही गोष्ट महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) या कारवाईमुळे उघडकीस आली आहे. त्याचबरोबर देशात अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतर-एजन्सी सहकार्याचे महत्त्व देखील या कारवाईने अधोरेखित झाले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »