महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

डीआरआयची झवेरी बाजारात धाड,सोन्याची तस्करी करणारी टोळी गजाआड

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, हाती आलेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी झवेरी बाजार येथील दोन ठिकाणी सोन्याची तस्करी करत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला. यातील पहिल्या ठिकाणी, कायदेशीर खरेदीचा कोणताही पुरावा नसलेली आणि परदेशी शिक्का असलेली 1 किलो सोन्याची बिस्किटे सापडली. पहिल्या धाडीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका ठिकाणी घातलेल्या छाप्यात परदेशी बनावटीचे 7.022 किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले 1,22,10,000/- रुपये (भारतीय चलन) ताब्यात घेण्यात आले. सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी आणखी 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यापैकी एका ठिकाणी सोने वितळवण्याचे काम सुरु असलेले आढळून आले.

अशा प्रकारे, या धाडींतून परदेशी बनावटीचे 4,78,74,547 रुपये मूल्याचे तस्करी करून आणलेले 8.022 किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले 1,22,10,000/- रुपये असा एकूण ऐवज ताब्यात घेण्यात आला.

यापैकी एका ठिकाणचा व्यवस्थापक, जो या टोळीचा सक्रीय सदस्य आहे आणि ज्याच्याकडून परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले, त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

सोने तस्करीमुळे देशाच्या आर्थिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण असून या समस्येचा व्यापक प्रमाणात सामना करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »