DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कोविड काळात समाजासाठी निष्ठेने कार्यरत राहिलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमए कल्याण शाखेच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर झाली असून, डॉ. सुरेखा ईटकर यांची अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे. सचिवपदी डॉ. शुभांगी चिटणीस तर खजिनदारपदी डॉ. तन्वी शहा यांची निवड झाली आहे. सह सचिव पदाची जबाबदारी डॉ. राहुल तिवारी यांनी स्वीकारले आहे. पुढील वर्षासाठी नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र लावणकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा पदग्रहण सोहळा कल्याण पश्चिम येथील आयएमए ऑडिटोरियममध्ये पार पडला. यावेळी केडीएमसी चे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल आणि मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. – कुलगुरू तसेच बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला कल्याण शहरातील अनेक नामवंत सामाजिक संस्थाचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळीआयएमए कल्याणच्या नव्या कार्यकारणीच्या निमित्ताने ट्रस्ट व्यवस्थापन समिती, स्टेट आणि सेंट्रल कौन्सिल साठी सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. ट्रस्टी म्हणून डॉ. नरेश पाटक, डॉ.प्रदीप कुमार सांगळे आणि डॉ. राजन माने यांची निवड झाली. व्यवस्थापन समितीत डॉ.अमित धर्माधिकारी,डॉ.दीप्ती दीक्षित, डॉ.विद्या ठाकूर ,डॉ.गिरीश बिरूड, डॉ.अभिजित सिंग आणि डॉ.प्रकाश देशमुख यांचा समावेश आहे. स्टेट कौन्सिलसाठी डॉ.संजय गोडबोले ,डॉ.विवेक भोसले, डॉ.प्रशांत खताले, डॉ.मनोज शर्मा आणि स्मिता महाजन तर सेंट्रल कौन्सिलसाठी डॉ.प्रदीप कुमार सांगळे, डॉ. अश्विनी कक्कर ,डॉ.प्रवीण भुजबळ आणि डॉ. स्नेहलता कुरीस यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष डॉ. सुरेखा इटकर यांनी सांगितले की, गेल्या कार्यकाळात आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे कार्य केले असून हंगामी काळातही ही वाटचाल अखंड सुरू ठेवू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिका नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी नव्या कार्यकारणीला शुभेच्छा देत कॅन्सर ,मानसिक आरोग्य व दिव्यांग विषयासह गंभीर आरोग्य मुद्द्यावर शासनासोबत संयुक्त उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे व्यक्त केले.