नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – मध्यप्रदेशाच्या हरदा जिल्ह्यातील शिराली तालुक्याच्या विहिरीत कुजलेला अवस्थेतील मृतदेह सना खानचा नसल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं. त्यामुळे मृतदेहाच गूढ आणखी वाढल आहे. त्यामुळे मिळालेल्या मृतदेहाची खात्री पटवण्यासाठी DNA टेस्ट केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
हरदा येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेला महिलेच्या मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत होते. त्यामुळे तो मृतदेह भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण कुटुंबीयांनी तो मृतदेह सना खानचा नसल्याचा दावा केल्यानं आता डीएनएचा पर्याय पोलिसांपुढे उरला आहे. त्यामुळे डीएनए चाचणीत काय सत्य पुढं येत याकडे लक्ष लागले आहे.



