नेशन न्युज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे शिर्डी लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून लढवर असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. शेतकरी संघटनेने या उमेदवाराबद्दल भुमिका मांडत म्हटलं की, आमचा पुरस्कृत उमेदवार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे हे उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार रिंगणात असणार आहेत.
त्यातच आता प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे अपक्ष म्हणून रिंगणात उतरत असल्याने शिर्डी लोकसभा निवडणुकीची रंगत वाढल्याचे चित्र आहे. अभिजीत पोटे हे प्रहारचे बच्चू कडू यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात तर पक्षाकडून उमेदवारी न करता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरं जाण्याचे ठरवले आहे.