महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद योजनेंतर्गत क्रीडा स्पर्धा केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर घेतल्या जातात. आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ऑल सेट्स हायस्कूल भवाळे, ता. भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले तसेच मशाल ज्योत पेटवली व पाच तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मानवंदना दिली.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे. शैक्षणिक शिक्षणासोबतच मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात. आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी दररोज खेळावे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

केंद्र पातळीवर प्रथम आलेले संघ तालुका पातळीवर आणि तालुका पातळीवर प्रथम आलेले संघ जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक प्रकारात तसेच मुले व मुली या स्वतंत्र गटात घेण्यात आल्या असून सांघिक स्पर्धेत खो खो, कबड्डी, लंगडी, लेझीम या खेळाचा तर वैयक्तीक स्पर्धेत ५० मिटर व १०० मिटर धावणे,  २५X४ रिले, लांब उडी व संगीत खुर्ची या खेळाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी प्रदीप घोरपडे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण प्राथमिक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. विद्या शिर्के व रविंद्र तरे यांनी सुत्रसंचलन करून विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढविला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »