नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – आदिवासी विकास विभागाअतंर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावू नये यासाठी शिक्षकांच्या कौशल्याची चाचपणी करण्यासाठी परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. या शासन निर्णयाच्या विरोधात या परीक्षांवर शिक्षकांनी बहिष्कार घातला होता. या बहिष्काराच्या घटनेबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिक्षकांना निर्देश दिले आहेत.
आता आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे सोबत शिक्षकांच्या परीक्षा देखील घ्यायचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्या विषयाच्या शिक्षकांची कमी आहे. शिक्षक शिकवत नाही असे समजण्यास मदत होईल.यासाठी त्या विषयाचे तज्ञ बोलून त्यांच्या कडून शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या त्रुटी दूर करता येईल. यामुळे मुलांच्या परीक्षा सोबत शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
आता मुलांची परीक्षा सोबतच शिक्षकांची देखील परीक्षा घेण्यात आली परंतु या परीक्षेत काही शिक्षकांनी परीक्षा दिली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांना आता परीक्षा का दिली नाही याबद्दल नोटीसा बजावण्यात येतील व नोटीसा देऊनही जर शिक्षकांनी पुन्हा परीक्षा दिली नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहे…



