महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डीएस राणा टांझानिया दौऱ्यावर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. 13 ते 15 मे 2024 या कालावधीत नियोजित या भेटीचे उद्दिष्ट दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत संरक्षण संबंध अधिक बळकट करणे आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करणे हे आहे.

आपल्या भेटीदरम्यान संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्सचे प्रमुख जनरल जेकब जॉन मकुंडा आणि त्यांचे समकक्ष संरक्षण गुप्तचर प्रमुख मेजर जनरल एमएन मकरेमी या टांझानियाच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी संवाद साधला. टांझानिया राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान ते टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्सच्या भावी नेत्यांसोबत भारताच्या सुरक्षेबाबत दृष्टिकोनावर चर्चा केली. परस्पर सामंजस्य वाढविणे आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे हे या बैठकांचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल डीएस राणा दार एस सलाम यांनी इथल्या भारतीय उच्च आयोग इथे नव्याने स्थापन केलेल्या संरक्षण कार्यालयाचे उद्घाटनही केले. लष्करी सहकार्याचा विस्तार करण्याच्या शुभेच्छांचे प्रतिक म्हणून ते भारतीय बनावटीचे बुलेट प्रूफ जॅकेट टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्सला सादर केला. संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक कमांड अँड स्टाफ कॉलेज सीएससी आरुषा येथे ग्रंथालयाचे उद्घाटन केले आणि भारत सरकारच्या सहाय्याने उभारल्या जाणाऱ्या व्यायामशाळेची पायाभरणी त्यांनी केली.

टांझानियासोबत भारताचे घनिष्ट, प्रेमाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध असून सशक्त क्षमता बांधणी आणि संरक्षण सहकार्याच्या संधींमुळे अधिक मजबूत आहेत. भारतीय लष्करी प्रतिनिधीमंडळाच्या या भेटीमुळे टांझानियासोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »