महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

डिझेलची तस्करी करणारी बोट तटरक्षक दलाने केली जप्त

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारतीय तटरक्षक दल हे देशाच्या सागरी सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात. सागरी क्षेत्रांचे संरक्षण, चाचेगिरी आणि तस्करी रोखण्यात आणि सागरी आपत्तींपासून संरक्षण करण्यात तटरक्षक दल महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मुंबईच्या वायव्येला डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट अनधिकृत रोख रकमेसह ताब्यात घेतली. सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित कारवाई करत आयसीजीच्या पश्चिम विभाग मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात करत, रात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीत आणि त्या भागात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या मासेमारी तसेच व्यापारी रहदारीमध्ये, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या विकास क्षेत्रासह 200 वर्ग मैलांच्या परिसरात अखंडितपणे शोध मोहीम राबवली गेली.

आयसीजीच्या दोन वेगवान गस्ती बोटी आणि एक इंटरसेप्टर बोट यांच्या समन्वयीत कारवाईत, संशयित बोटीचे ठिकाण निश्चित करण्यात आले आणि 15 एप्रिल 2024 च्या रात्रीत बोटीवर प्रवेश करण्यात आला. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, डिझेल तस्करीच्या उद्देशाने संशयित भारतीय सागरी पुरवठा जहाजाच्या दिशेने जाण्यासाठी पाच खलाशी असलेली ही बोट मांडवा बंदरातून 14 एप्रिल 2024 रोजी निघाली. या बोटीवर 20,000 लिटर इंधन साठवण्यासाठी रचनेत बदल केले असल्याचे तसेच ही बोट अनेक खोट्या आणि वेगवेगळ्या नावांनी चालवली जात असल्याचे आढळून आले.

संशयित बोटीवर आढळून आलेल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या माहितीचा अर्थ लावल्यावर या बोटीच्या नोंदणीमध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आढळून आल्या. तसेच तस्करी केलेल्या डिझेलच्या बदल्यात किनारपट्टीवर कार्यरत काही भारतीय ओएसव्हीना देण्याच्या उद्देशाने ठेवलेली 11.46 लाख रुपयांची रोख रक्कम देखील या बोटीवर सापडली. ही बोट 17 एप्रिल 2024 च्या पहाटे मुंबई बंदरात आणण्यात आली असून या संदर्भात आणखी धागेदोरे शोधण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क विभाग आणि राज्य पोलीस दल यांच्यातर्फे संयुक्त तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

Related Posts
Translate »