DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अतुल मोने आणि संजय लेले यांच्या कुटुंबीयांची रविवार 27 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनही कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.आपले सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शासनाकडून तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
तसेच यातील पीडित कुटुंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.यावेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, जितेन पाटील, तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, कविता गावंड, बाळा म्हात्रे, संदीप सामंत,संजय निक्ते, राहुल गणफुले, विवेक खामकर, संतोष चव्हाण,राहुल म्हात्रे अनमोल म्हात्रे आदी शिवसैनिक उपस्थित होते.