नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी व आंबेडकरवादी संघतनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. त्यात मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अन्याय अत्याचार, समान नागरी कायदा विरोधात तसेच मध्यप्रदेश येथे एका युवकावर मूत्र विसर्जन केल्याचा विरोधात निषेध नोंदविण्यात आला.
आदिवासींचे जे हक्क अधिकार संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत ते संपवण्याचा कट कारस्थान शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दररोज देशात SC/ST समूहावर अन्याय, अत्याचार होत आहे. त्यामुळे त्यांचा तीव्र निषेध राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आला. तसेच समान नागरी कायदा या कायद्याचे शासनाच्या वतीने तो कायदा काय आहे?त्या कायद्याची संहिता काय आहे? ते अगोदर शासनाने स्पष्ट करावे जर आदिवासींच्या आणि अनुसूचित जाती व ओबीसी यांचा संविधानिक हक्क हिरावनाच्या प्रयत्न जर शासनाच्या वतीने केला तर त्याचा तीव्र प्रकारचे आंदोलन येणाऱ्या काळात आदिवासी व आंबेडकरवादी, बहुजनवादी संघटनाच्या वतीने केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. यासाठी सदर 7 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने भारत बंद ची घोषणा देण्यात आली आहे. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



