नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – 21 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत विक्री करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये अनुदान मिळणार असल्याचे घोषणा राज्य सरकारने केली होती. 31 मार्चला कांदा विक्री करण्यासाठी कांदा उत्पादकांनी मार्केट मध्ये रांगा लावलेल्या होत्या. परंतु ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल पासून कांदा विक्री करणार त्यांना या अनुदानाचे लाभ मिळणार नाही असल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.
अजून काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा उभा आहे, तर काही शेतकरी कांदा काढून मार्केटला विक्रीसाठी आणत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. आधीच कांद्याला भाव नाही, लागलेला खर्च तो देखील निघत नाहीये अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या अनुदानाची मुदतवाढ झाली तर शेतकरी कुठेतरी तारला जाईल, त्याला दिलासा मिळेल. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची तारीख 31 मार्च केलेली होती ती तारीख 30 एप्रिल पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेचे नेते यांनी शासनाकडे केलेली आहे.



