महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन

पुणे/प्रतिनिधी – कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा, घोड शाखा कालवा व पिंपळगाव जोगे कालव्यात तर मिना शाखा कालव्यात २० डिसेंबरपासून  पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सिंचनभवन येथे झालेल्या बैठकीला  आमदार अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, बाळासाहेब आजबे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.

कुकडी प्रकल्पामध्ये ३ डिसेंबर २०२१ रोजी २३.८९ टीएमसी (८०.५१ टक्के) पाणी उपलब्ध आहे. या पाण्यातून बाष्पीभवन, पिण्याचे पाणी, आरक्षण, विभागणी साठा, इत्यादीसाठी लागणारे पाणी वजा करता रब्बी हंगाम नियोजनासाठी १५.२० टीएमसी पाणी नियोजनासाठी उपलब्ध आहे.

प्रकल्पातील उपलब्ध पाण्यातून प्रकल्पातील सर्व कालव्याचे एक आवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालवानिहाय रब्बी आवर्तन सुरू करण्याच्या तारखाही ठरविण्यात आल्या. कुकडी डावा कालवा १ जानेवारी २०२२, डिंभे उजवा कालवा, घोड शाखा कालवा, पिंपळगाव जोगे डावा कालवा २५ डिसेंबर २०२१ व मिना शाखा कालव्यातून २० डिसेंबर २०२१ रोजी आवर्तन सुरू करण्यात येईल. याबरोबरच डिंभे डावा कालवा, मिना पुरक कालवा हे कालवे आणि कुकडी, मिना व घोड नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे बंधाऱ्याचे आवर्तन आवश्यकतेनुसार सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कुकडी प्रकल्पातील कालव्यांची “माझा कालवा माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत स्वच्छता केल्याने कालव्यांची वहनक्षमता वाढली आहे. अशा परिस्थितीत आवर्तनादरम्यान पुरेशा दाबाने पाणी मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग काटकसरीने व कार्यक्षमतेने करावा, असे आवाहन जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी केले.

कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीस कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनश्याम शेलार, देवदत्त निकम, अशोक घोडके,सुदाम पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे, उपायुक्त नंदीनी आवडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »