नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – सध्या मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील दिग्गज नेते मुंबईत दाखील होत असताना , महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील सध्याचा डाव पाहता शिंदे सरकार विरोधी मतंमतांतरे मांडताना विरोधी पक्ष व नेतेमंडळी दिसून येतात. ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत ह्यांनी शिंदे सरकार संताप व्यक्त केला.
खा. विनायक राऊत म्हणाले, मंत्री उदय सामंत यांनी आपल्या बुडाखाली काय जळत आहे ते पहावं. शासकीय निधीवर डल्ला मारुन स्वत:चं टिमकी मिरवणारं हे शिंदे सरकार आहे. बावनकुळे यांची बोलक्या पोपटाच्या पुढे काही जवाबदारी नाही.अश्याप्रकारे त्यांनी आपले मत व्यक्त केले.



