महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नसल्याने पत्रीपुलाबाबत टिका – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

प्रतिनिधी.

कल्याण – अंतिम टप्प्यामध्ये काम आलेल्या पत्रीपुलाच्या उभारणीत किती अडचणी आल्या हे सर्वश्रुत आहे. मात्र आता लवकरच तो पूर्ण होणार असून विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही नसल्याने पत्रीपुलाच्या मुद्द्यावरून विनाकारण टिका होत असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. खासदार डॉ. शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाची पाहणी केली.
कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आलेले असले तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक मुद्द्यांबरोबरच गेल्या वर्षी कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचाही पुलाच्या कामावर परिणाम झाला असला तरी या सर्व अडचणींवर मात करून हा पूल लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रीपुलावर मुख्य सिमेंट काँक्रीट टाकण्याचे स्लॅब काम झाले असून दोन्ही बाजूकडील अप्रोच रोडचे कामही वेगाने सुरू आहे. उर्वरित कामे ही काही दिवसात पूर्ण होईल. हे तांत्रिक काम आहे, यामध्ये किती अडचणी आल्या हे सर्वांना माहिती आहे. त्यावर यशस्वी मात करून आपले काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांतच पत्रीपुल सूरु होईल असा विश्वास व्यक्त करत खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही राहिले नसल्याने विनाकारण या मुद्द्याचा बाऊ केला जात असल्याचे स्पष्ट केले.

तर मुळातच हा पूल करण्यासाठी एमएसआरडीसीने मार्च 2021 ची डेडलाईन आखून दिली असून त्यामध्ये लॉकडाऊनच्या सहा महिन्यांची शासनाकडून मुदतवाढही देण्यात आल्याची माहिती पुलाच्या कंत्राटदाराने दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम अपेक्षेपेक्षा अधिक लवकर पूर्ण होत असल्याचेही या कंत्राटदाराने सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »