नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – आज काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन उमरेड रोडवरील बहादुरा मैदानावर करण्यात आले आहे. महारॅली सभेतून लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं रणशिंग फुंकत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते या सभेत संबोधित करणार आहेत. प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित रहाणार असल्याचं बोललं जातं आहे.
या स्थापना दिवसानिमित्त काँग्रेसचे देशभरातील नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ, नेते आमदार, खासदार असणार आहेत. यासाठी भव्य स्टेज उभारत तीन मंचावर नेते मंडळी तर एका मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. या महारॅलीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्यने काँग्रेस कार्यकर्ते सामील होतील असा दावा केला जात आहे.



