महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पर्यावरण लोकप्रिय बातम्या

कचर कुंडी झालेल्या बारवा विहिरीच्या संवर्धणासाठी प्रशासनाच्या मोहिमेला सुरुवात

नेशन न्यूज मराठी टीम.

लातूर – मध्ययुगीन काळात शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभर जनतेला मिळावे म्हणून अत्यंत कमी बाष्पीभवन होणाऱ्या बारवा विहिरींची निर्मिती झाली. मागच्या चार पाच दशकात गावागावात आणि शहरात पाणी पुरवठा योजना आल्या… आणि ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणी प्रमाणे शेकडो वर्षे तहान भागविणाऱ्या बारवा कचरा कुंडी झाल्या. जिल्हा प्रशासनाने या बारवाचे संवर्धन करायचे ठरवले असून आज बारवाचे शहर रेणापूर, ज्या शहरात 16 बारवा विहिरी आहेत. त्या शहरापासून या मोहिमेला जिल्हा नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, लातूर देवराईचे प्रवर्तक सुपर्ण जगताप, पर्यावरणासाठी काम करणारे पत्रकार दीपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ. बी. आर. पाटील,यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यमातील वरिष्ठ पत्रकार यावेळी उपस्थित होते.

भारतीय समाज जल, जमीन आणि जंगल राखण्यासाठी पुढे येतो आहे…या कामी हजारो हात पुढे येऊन जोडले जातील.. आणि जल संवर्धनाबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन होणारी ही चळवळ लातूरचा आणखी एक नवा पॅटर्न तयार करील, अशी अपेक्षा यावेळी सर्वांनी व्यक्त केली आहे.

टोळ्यातून समूहात आणि समूहातून ग्राम व्यवस्थेत मानवी जीवन स्थिर झालं ते पाण्याच्या काठी… माणसांची, जनावरांची तहान भागवणारी व्यवस्था माणूस प्रगत होत गेला तसतशी बदलत गेली… डेक्कन बेल्ट हा पक्क्या अग्निजन्य खडकातला.. भूगर्भ स्त्रीस्तरीय रचनाचा.. आणि प्रखर उष्णतेचा त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन टाळण्यासाठी 11 व्या शतकापासून राष्ट्रकुट, चालुक्य, यादव यांच्या काळा पर्यंत मोठ्या प्रमाणात बारवा विहिर बांधण्याची व्यवस्था निर्माण झाली. अशा बारवा लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. काही गावातील आणि शहरातील बारवा शेकडो वर्षाचा इतिहास सोबत घेऊन अजूनही नांदत आहेत.. यांचे वैभव परत येणार नाही पण त्यांनी लाखो लोकांची तहान भागवली, त्या मानवतेच्या दृष्टीने कृतज्ञता म्हणून तसेच आपल्या संस्कृतीच्या वैभवी खुणा म्हणून त्या जपल्या पाहिजेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या सहकार्याने हे काम लातूर जिल्ह्यात होणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »