महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

कोळसा वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी कोळसा मंत्रालयाचा पुढाकार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – कोळसा मंत्रालयाने कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी -रेल्वे मार्गाला  प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला असून, देशांतर्गत कोळशाच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी रेल्वे -सागरी -रेल्वे (आरएसआर ) एकात्मिक  वाहतूक मार्गाचा वापर करणे हा यामागचा उद्देश आहे. ही मल्टीमोडल वाहतूक प्रणाली खाणींपासून बंदरांपर्यंत आणि नंतर शेवटच्या वापरकर्त्यांपर्यंत कोळशाची अखंड वाहतूक ,वाहतूक खर्च कमी करते आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारते.
वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोळसा बाहेर काढून वाहतूक करण्यासाठी  सुनियोजित आणि कार्यक्षम व्यवस्था  आवश्यक आहे.

देशातील कोळसा वाहतुकीसाठी  दीर्घकालीन योजना तयार करण्याच्या उद्देशाने,  कोळसा मंत्रालयाने अतिरिक्त सचिव अध्यक्षतेखाली एक आंतर-मंत्रालय समिती (आयएमसी ) स्थापन केली आहे.  यामध्ये ऊर्जा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय व  बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालय यांचा समावेश आहे. कोळसा वाहतुकीमध्ये सध्या रेल्वेचा वाटा सुमारे 55%  असून आर्थिक वर्ष 30 पर्यंत हा वाटा 75% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. कोळसा मंत्रालय आर्थिक वर्ष 30 पर्यंत अधिकाधिक कोळसा बाहेर काढून वाहतूक वाढवण्याच्या  गरजेवर भर देत आहे.  तसेच गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरएस /आरएसआर  यांसारखे कोळसा वाहतुकीचे पर्यायी मार्ग वाढवण्याकडे भर आहे. सध्याच्या 40 मेट्रिक टनवरून 2030 पर्यंत 112 मेट्रिक टन कोळशाच्या आरएसआर वाहतुकीला  प्रोत्साहन देण्यासाठी समितीने अनेक उपायांची शिफारस केली आहे. हे धोरण  बहुआयामी फायदे देणारे आहे. सर्वप्रथम, कोळशाची वाहतूक  करण्यासाठी  अतिरिक्त पर्यायी मार्ग प्रदान केल्यामुळे  सर्व-रेल्वे मार्गावरील अतिरिक्त ताण कमी होण्याची शक्यता आहे.. दुसरे म्हणजे, भविष्यात निर्यातीसाठी वापरता येतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करून निर्यातीच्या संधी निर्माण करता येतील  आणि शेवटी, एआरआरच्या तुलनेत आरएसआरमध्ये कार्बन उत्सर्जन  लक्षणीयरीत्या कमी आहे.

किनारी नौवहन पद्धती ही माल वाहतुकीसाठी  किफायतशीर आणि पर्यावरणपूरक व्यवस्था असून त्यात भारताच्या लॉजिस्टिक उद्योगात क्रांती घडवण्याची क्षमता आहे.आरएस /आरएसआर सारख्या मार्गाने कोळसा वाहतूक वाढवण्याचे सुरु असलेले प्रयत्न, दक्षिणेकडील आणि पश्चिम किनार्‍यावरील बंदरांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमधील ऊर्जा केंद्रांमध्ये अधिक कोळशाची कार्यक्षम वाहतूक करणे शक्य होईल. सर्व मंत्रालयांद्वारे गंतव्यस्थानांपर्यंत कोळसा वाहतूक कार्यक्षमपणे करण्यामधील  आव्हानांवर मात करण्यासाठी आंतर-मंत्रालय समितीच्या शिफारशी हा “  संपूर्ण सरकार ” दृष्टिकोनाचा भाग आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »