नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या मुहूर्तावर चिखली पोलिसांनी आपली सलामी दिली असून, खामगाव वरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनर मधून अवैध वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गांजा पकडण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. चिखली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत 210 किलो गांजा पकडला, जिल्हा वाहतूक शाखेतील संतोष चिडे, निलेश शिंगणे आणि चिखाली पोलिसांनी हि कारवाई केली आहे. लोकशाहीची आदर्श आचारसंहितेच्या सुरुवातीलाच ही जबरदस्त कारवाई करण्यात आल्याने चिखली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निरीक्षक संग्राम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिखली पोलीस टीम, जिल्हा वाहतूक चे संतोष चिडे , निलेश शिंगणे ही कारवाई केली आहे. याबाबत असे की, लाखो रुपयांचा गांजा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून खामगाव जालना रोडवरील भानखेड जवळ अवैधपणे वाहतूक होत असलेला 210 किलोच्या वर गांजा जप्त केला. चिखली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.



