नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – १५ मे रोजी नरेंद्र मोदी यांचा मुंबई मध्ये रोड शो असल्यामुळे LBS मार्गाचा वापर केला जाणार आहे. यासाठी मुंबई वाहतूक विभागाने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये गांधी नगर जक्शन ते आर बी कदम मार्ग, एम जी च्या आर बी कदम चौक ते मेघराज मार्ग हा दुपारी २ ते रात्री १० वाजे पर्यंत वाहतूकसाठी बंद राहणार आहे.
त्याच बरोबर LBS मार्गावर येणारे ए जी एल् आर, जे वी एल् आर वा इतर मार्ग आवश्यकतेनुसार बंद करण्यात येतील. या मार्गाचा वापर करण्याऱ्या सर्व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. रोड शो चा मार्ग आर सिटी मॉल, अशोका मिल या ठिकाणावरून सुरु होऊन आर बी कदम चौक या ठिकाणावरून पुढे पार्श्वनाथ चौक पर्यंत असणार आहे. अशी माहिती राजु भुजबळ, डी.सी.पी. वाहतूक विभाग यांनी दिली.