महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

सीडीएस जनरल अनिल चौहान बेंगळुरू दौऱ्यावर

नवी दिल्ली/प्रतिनिधी – सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी बेंगळुरूमधील विमाने आणि प्रणाली चाचणी आस्थापना तसेच वायु सेना चाचणी वैमानिक विद्यालयाला भेट दिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनी 24 मे 2024 रोजी बेंगळुरू येथील विमाने आणि प्रणाली चाचणी आस्थापना (एएसटीई) आणि वायु सेना चाचणी वैमानिक विद्यालय (एएफटीपीएस) या ठिकाणांना भेट दिली. यावेळी एका औपचारिक संचलनाचे आयोजन करण्यात आले. उड्डाण चाचणी घेत असताना आपल्या जीवनाचे बलिदान देणाऱ्या भारतीय चाचणी चमूचे सदस्य आणि शास्त्रज्ञांच्या स्मारकाला जनरल अनिल चौहान यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. या दौऱ्याचा एक भाग म्हणून जनरल चौहान यांना भारतीय वायु सेनेच्या एएसटीई येथे सुरू असलेल्या चाचण्या आणि एएफटीपीएस’च्या उड्डाण चाचणी प्रशिक्षण उपक्रमांबरोबरच या अद्वितीय संस्थांच्या संघटनात्मक भूमिकांच्या पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. आत्मनिर्भरता आणि प्रशिक्षणसंबंधी पायाभूत सुविधांचा एक भाग म्हणून एएसटीई आणि एएफटीपीएस येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली आणि त्यांच्यासमोर स्वदेशी प्रकल्पांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. सीडीएस जनरल चौहान यांनी एएसटीई आणि एएफटीपीएस’च्या पाच दशकांच्या दीर्घ प्रवासातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक टप्पे दर्शविणाऱ्या कलाकृती ठेवलेल्या एएसटीई संग्रहालयाला देखील भेट दिली.

जनरल अनिल चौहान हे, एएफटीपीएस येथे आयोजित 46 व्या फ्लाइट टेस्ट कोर्सच्या समापन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. एकूण 17 विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर झाले आहेत. एएसटीई’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पारंपारिक सुरंजन दास रात्रीभोजाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पदवीधर विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या वैवाहिक जोडीदारांनाही पात्रता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाच विद्यार्थ्यांना चषक प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चाचणी वैमानिकाला दिला जाणारा सुरंजन दास चषक स्क्वाड्रन लीडर ए. बेरवाल यांना सर्वोत्कृष्ट उड्डाण मूल्यांकनासाठी दिला जाणारा सी ए एस चषक स्क्वाड्रन लीडर पुरस्कार कपिल यादव यांना देण्यात आला. महाराजा हनुमंत सिंहजी तलवार सर्वोत्कृष्ट एफटीई पुरस्कार स्क्वाड्रन लीडर व्ही सुप्रिया यांना देण्यात आला. अभ्यासक्रमातील विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा कपिल भार्गव चषक स्क्वाड्रन लीडर रजनीश राय यांना आणि सर्वोत्कृष्ट उड्डाण मूल्यांकनासाठी दिला जाणारा डनलॉप चषक लेफ्टनंट कमांडर गौरव त्यागी यांना प्रदान करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला भारतीय वायुसेनेचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ – ट्रेनिंग कमांड तसेच अनुभवी चाचणी चमू देखील उपस्थित होते. एएफटीपीएसच्या ऑफिसर कमांडिंग यांनी या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आढावा आणि अभ्यासक्रमाचा अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात भारताची तिन्ही सैन्यदले, भारतीय तटरक्षक दल, एचएएल, डीआरडीओ आणि मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना फ्लाइट चाचणी प्रशिक्षण देण्यासाठी डी-फॅक्टो सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून संस्था बजावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.

आपल्या समारोपाच्या भाषणात, सीडीएस जनरल चौहान यांनी कमांडंट एएसटीई आणि एएफटीपीएसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, या विशिष्ट क्षेत्रात प्रशिक्षणाचा उच्च दर्जा राखल्याबद्दल तसेच भारतीय वायुसेनेच्या क्षमता निर्माण आणि आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल कौतुक केले. यामध्ये देशातील लष्करी विमान वाहतूक सेवेचे अद्यतनीकरणाचाही समावेश आहे. त्यांनी पदवीधर अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, आणि देशसेवेसाठी आवश्यक सुसज्जतेसाठी गुणवत्ता आणि सुरक्षितेची मानके पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक सक्षमतेच्या महत्त्वावर भर दिला. प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यार्जन करताना उत्कृष्ट व्यावसायिक क्षमता प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम घेत राहिल्याबद्दल सीडीएस चौहान यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

 

Related Posts
Translate »