महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश लोकप्रिय बातम्या

रेड नोटीस जारी झालेल्या दोन आरोपींना भारतात आणण्यात सीबीआयला यश

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ग्लोबल ऑपरेशन सेंटरने इंटरपोल एनसीबी – अबू धाबी, केरळ पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अबुधाबीमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधत आज रेड नोटिशींची अंमलबजावणी करत दोन आरोपींना भारतात आणले. सीबीआयने त्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून बारकाईने पाठपुरावा केला.

त्यापैकी पीरू मोहम्मद याह्या खान या आरोपीला भारतातील केरळ पोलिसांकडे सोपवण्यात आले. कोट्टायम येथील पाला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 403/2008 साठी तो पोलिसांना हवा होता. केरळमध्ये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत आणि बलात्कार असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. केरळ पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयला 10 जानेवारी 2024 रोजी इंटरपोल महासचिवालयाकडून या संदर्भात रेड नोटीस मिळाली होती. सर्व इंटरपोल सदस्य देशांना आरोपीचे स्थान कळविण्यात आले होते आणि अटक करण्यासाठी रेड नोटीस पाठवण्यात आली होती. इंटरपोल-अबू धाबीच्या समन्वयाने केरळ पोलिसांच्या पथकाने त्याला भारतात आणले.

त्याचबरोबर सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन सेंटरने सुभाष विठ्ठल पुजारीला चीनमधून भारतात आणण्यासाठी मुंबई पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधला. मुंबई पोलिसांच्या पथकाने आज त्याला परत आणले आहे. मुंबई पोलिसांना अनेक गुन्ह्यांप्रकरणी तो हवा होता. विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हे क्रमांक 244/07 व 286/09 तर गुन्हे प्रकटीकरण कक्ष (डीसीबी), गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गुन्हे क्रमांक 154/2009 साठी तो हवा होता. खुनाचा प्रयत्न, खंडणी, गुन्हेगारी धमकी, शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत (मकोका) त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. सीबीआयला 14 फेब्रुवारी 2012 रोजी इंटरपोल महासचिवालयाकडून या संदर्भात रेड नोटीस जारी करण्यात आली होती.

त्यानंतर ही रेड नोटीस सर्व इंटरपोल सदस्य देशांना आरोपीच्या ठाव-ठिकाण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पाठवण्यात आली.इंटरपोलसाठी भारतातील राष्ट्रीय मध्यवर्ती विभाग म्हणून सीबीआयने मदतीसाठी भारतातील सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांशी समन्वय साधला.

Related Posts
Translate »