महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी तंत्रज्ञान

आरोग्य विकासासाठी जालना जिल्हा परिषदेचा कैपजेमिनी – अमेरिकन इंडिया फाऊंडेशनशी करार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन जालना जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांचा स्तर आणखी उंचविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी यांच्या दरम्यान हा करार करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज हा करार करण्यात आला. प्राथमिक टप्प्यात जालना जिल्ह्यातील घनसावंगी जालना आणि अंबड तालुक्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे, असे श्री टोपे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या या कार्यक्रमाला कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी आरती श्रीवास्तव, अनुराग प्रताप, प्रतिभा शर्मा, अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे प्रमुख मॅथ्यू जोसेफ, डॉ. महेश श्रीनिवास आदी उपस्थित होते. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

या सामंजस्य करारानुसार आशा वर्कर्स यांना टॅब , पॉईंट केअर डिव्हाईस, डिसीजन सपोर्ट सिस्टीम, आशा वर्कर्स यांच्या कामकाजाचे डिजिटायझेशन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रकल्प पुढील पंधरा महिन्यांच्या कालावधीत सुरु राहील, असे श्री टोपे यांनी सांगितले.

या सामंजस्य करारानुसार जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी एकत्रित काम करणार आहे. यामध्ये जालना जिल्हा परिषद पुढाकार घेऊन काम करेल. तसेच आवश्यक असणारी सर्व मदत पुरवेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल यांनी दिली.

कैपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा यांनी सांगितले की, आरोग्य सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी कंपनी डिजीटल सहाय्य देईल. आशा वर्कर्स यांच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येण्यासाठी कंपनी माहिती तंत्रज्ञान सहाय्य करेल.

यावेळी जालना जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, सल्लागार डॉ. संतोष भोसले, कैपजेमिनी कंपनीच्या ऋता साटम आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »