DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण नोडल ऑफिसर डॉ प्रतिभा पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ७/०५/२०२५ ते दि. १०/०५/२०२५ हजार या कालावधीमध्ये खडे गोळीवली नागरी आरोग्य केंद्र, टिटवाळा नागरी आरोग्य केंद्र, आधारवाडी नागरी आरोग्य केंद्र ,महाराष्ट्र नगर नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी ठाणे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार व डॉ. अशोक नांदापूरकर आरोग्य सेवा ठाणे यांचे सहकार्य लाभले. सदर सदर शिबिरामध्ये ६४८ नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 333 नागरिकांची मुख कर्करोग तपासणी , १९२ लाभार्थ्यांची स्तन कर्करोग तपासणी आणि १२३ लाभार्थ्यांची पॅप स्मिअर तपासणी करण्यात आली. यामध्ये सापडलेल्या संशयित रुग्णांची कर्करोगाची बायोप्सी घेण्यात आली.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार त्वरित सुरू करून रुग्ण सुखरूप बरा होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारची शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्यात येतील असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले .सदर कर्करोग तपासणी करिता डॉ दिपाली मोरे ,डॉ सोनाली महातेकर, डॉ सफा बर्डी, डॉ. भारती पाटील यांनी परिश्रम घेतले.
