नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25 चा 3182 कोटींचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सभागृहात सादर केला. प्रशासक असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला त्यांनी त्यांना असलेल्या अधिकारात त्याला तात्काळ मंजूरी दिली.
यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन ,क्रीडा सुविधासह,महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ,शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आलाय.यंदा कोणतीही कर वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय . यंदाच्या अर्थसंकल्पात शहरातील विकास कामांचा ,आरोग्य यंत्रणा, शिक्षण व्यवस्था सदृढ करण्याबाबत भरवी तरतूद करण्यात आली आहे पुढील वर्षात नागरिकांना या सर्व सुविधांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आयुक्त इंदूरानी जाखड यांनी यावेळी व्यक्त केली आहे.



