DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका शाळा व खाजगी शाळा अश्या 280 शाळांमध्ये सुमारे 63,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . शासनातर्फे कल्याण डोंबिवलीतील शाळांसाठी 3,87,000 मोफत पुस्तके प्राप्त झाली आहेत आणि आता 2 जून पासून महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये समूह साधन केंद्रांचे मार्फत सर्व शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे शालेय व बालवाडी विद्यार्थ्यांना युनिफॉर्म , दप्तर, बूट, रेनकोट शालेय वह्या व बालवाडी लेखन साहित्य हे जून मध्ये देण्याच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्यात आली असून गणवेशाच्या बाबतीतील निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली .तसेच बूट, रेनकोट , दप्तर हे शासनाच्या आदेशाने DBT मार्फत दर निश्चित करून पुरविण्यात येणार असल्याचेही उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले .