महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा लोकप्रिय बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय असणा-या नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा कोरोनाच्या मधल्या दोन वर्षाच्या खंडानंतर विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न्‍ झाल्या. राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या 157 शरीरसौष्ठवपटूंमधून मुंबईच्या रसेल दिब्रेटो यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत सव्वालाख बक्षिस रक्कमेसह नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू – 2023 किताबासह मानाचा चषक स्विकारला.

कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर यांनी 45 हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री 2023 या नवी मुंबई महानगरपालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी 69 स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटूचे विजेतेपद 50 हजार पारितोषिक रक्कम व मानाच्या चषकासहीत ऐरोलीच्या सतीश यादव यांनी पटकाविले. वाशीच्या महेद्र शेडगे यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद 25 हजार रक्कमेसह संपादन केले. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या चंद्रशेखर पवार यांनी बेस्ट पोझर तसेच ठाण्याच्या सुदर्शन खेडेकर यांनी मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर किताब पटकाविला. या दोघानांही प्रत्येकी रु. 15 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्ती पत्रासह प्रदान करण्यात आली. 225 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शसीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसगी बोलताना त्यांनी नवी मुंबई शहराने प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे वेगळेपण सिध्द केले असून क्रीडा क्षेत्रातही अनेक खेळाडू शहराच्या नावलौकिक वाढवित आहेत अशी प्रशंसा करीत नवी मुंबई ही नागरिक केंद्रबिंदू मानणारी महानगरपालिका असल्याने सर्वांच्या एकत्रित सहयोगातून यशोकिर्तीस पात्र झाली असल्याचे सांगितले. शुभारंभप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी नवी मुंबईकर खेळाडूंना विविध उपक्रमांच्या आयोजनातून व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करण्याची व त्यासोबतच त्यांना इतर चांगल्या खेळाडूंचा खेळ बघून प्रेरणा घेण्याची संधी देण्याची महानगरपालिकेची भूमिका विशद केली. आगामी महिन्याभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

स्पर्धा शुभारंभप्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, अनंत जाधव, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, माजी नगरसेवक रविंद्र म्हात्रे उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी माजी खासदार व नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी 1996 पासून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेला महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धा उपक्रम मधील 2 वर्षाचा कोव्हीड कालखंड सोडला तर अव्याहतपणे सुरु असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या आजवरच्या अनेक शरीरसौष्ठवपटूंनी पुढे या क्षेत्रात फार मोठा नावलौकीक मिळविलेला आहे याबद्दल आनंद व्यक्त करीत या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता राज्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या मनात एक वेगळी आपुलकीची व अभिमानाची भावना असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच सर्व क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम आयोजनात सातत्य राखल्याबद्दल क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे कौतुक केले. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, क्रीडा विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, नवी मुंबई महानगरपलिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव ॲड. विक्रम रोटे, ग्रेटर मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे महासचिव नंदकुमार खानविलकर, ठाणे बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव राजेंद्र चव्हाण, नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव श्री हेमंत खेबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 55,60,65,70,75,80,85 किलोपर्यंत व 85 किलोवरील अशा 8 वजनी गटामध्ये आयोजीत करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा 50,55,60,65,70 किलोपर्यंत व 70 किलोवरील अशा 6 वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रत्येक वजनी गटातील 6 विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कोव्हीडच्या 2 वर्षाच्या खंडानंतर या स्पर्धा संपन्न होत असल्याने सायं. 5 वाजल्यापासून रात्री 11.30 पर्यंत विष्णुदास भावे नाटयगृहात शरीरसौष्ठवपटूंचा व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या क्रीडारसिकांचा जल्लोश होता.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »