नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – सध्या देशभर सुरु असलेली परिस्थिती पाहता, शिवसेनेचे खासदार संजय राऊत ह्यांनी मुंबईत माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते म्हणाले कि, भारतीय जनता पक्षाकडे सध्या भ्रष्टाचाराशिवाय दुसरा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. गेल्या दहा वर्षात जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनी देखील त्यांच्या काळात केला नसेल. काल गुजरात मंत्रालयाचे वेगळे प्रकरण बाहेर आले आहे. 3700 कोटींचा घोटाळा भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेल्या उद्योगपतींना कसा मिळवून दिला गेला? हे समोर आले आहे. अशी रोज प्रकरण येत आहेत, केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे.
महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे. तो म्हणजे दंगली पेटवायच्या, लहुजी सारखे मुद्दे समोर आणायचे ,दंगली घडवायच्या, मोर्चे काढायचे, परंतु 2024 झाली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही, अशी गॅरंटी इंडिया पक्षातर्फे आम्ही देत आहोत.
ज्या ठिकाणी चद्रयान ने तिरंगा फडकवला आहे, त्या जागेला वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं नाव दिलं पाहिजे. हे सर्व पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी जे काम केलं आहे, त्यामुळे हे आपलं यान हे चंद्रावर गेला आहे. तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता परंतु काही गोष्टी असतात, त्या विज्ञानाशी जोडलेल्या असतात. हे वीर सावरकरांचे म्हणणे देखील आहे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्या धर्माचे अतिक्रमण ठीक नाही.
उत्तर सभा होत आहेत. या उत्तर सभ्यांना कोण विचारत नाही. मुख्य सभेला महत्त्व आहे. यांच्या उत्तर सभा म्हणजे स्वतःवरती अंत्यसंस्कार आणि उत्तर क्रिया आहेत. असे संजय राऊत



