महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी मुंबई

विरार मध्ये प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर बीआयएसची कारवाई

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी – मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक विभागा (बीआयएस) च्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 जुलै 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या जागेवर छापा घातला. पालघर जिल्ह्यातील विरारमधीलबोळींज स्थित एम/एस पटेल टिंबर ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्याकडे बनावट/रद्द केलेले/कालबाह्य झालेले बीआयएस परवाना क्रमांक असलेले प्लायवूड साठवले आणि  विकले जात असल्याचे उघड झाले.

बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) आणि (3) चे हे उल्लंघन असून त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान रु. 2,00,000 दंड किंवा या दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. 

बीआयएस कायदा 2016 नुसार – कोणतीही व्यक्ती बीआयएसकडून कायदेशीर परवाना घेतल्याशिवाय कोणत्याही वस्तू, वस्तूंची निर्मिती, वितरण, विक्री, भाड्याने देणे, लीजवर देणे, प्रदर्शन, विक्रीसाठी ऑफर, प्रक्रिया, प्रणाली किंवा सेवा यासाठी किंवा कोणत्याही पेटंटच्या शीर्षकात, ट्रेड मार्क अथवा डिझाईनमध्ये मानक चिन्ह किंवा त्याची हुबेहुब नक्कल वापरू शकत नाही.

बीआयएस ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था असून ती बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. सर्व ग्राहकांनी मोबाईल ॲण्ड्रॉईड व आयओएस या दोन्हीसाठी उपलब्ध असलेल्या बीआयएस केअर ॲपचा वापर करण्यासाठी ही संस्था प्रोत्साहन देते. तसेच, बीआयएसप्रमाणित असणे आवश्यक असलेल्या उत्पादनांची यादी, कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील आयएसआय मानक चिन्ह खरे आहे की नाही हे बीआयएसच्या http://www.bis.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासावे, असे आवाहन बीआयएसने केले आहे. तसेच, कुठेही बीआयएसप्रमाणपत्र आवश्यक असलेली उत्पादने प्रमाणपत्राशिवाय विकली जात असतील किंवा कुठल्याही उत्पादनावर आयएसआय मानकाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन बीआयएसने सर्व नागरिकांना केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »