DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात, भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्या बरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षनिक द्रुष्ट्या मौलिक असे योगदान भारतीय समाजाला दिलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाटी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी हा शासनाचा हेतु आहे.
यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी संबंधीत विषयांवर परिसंवाद, त्यांच्या विचारधार वर ग्रंथोत्सव, ग्रंथप्रदर्शन निबंध स्पर्धा, चित्रकला साध अध्यापन तसेच त्यांच्या कार्याशी संबंधीत इतर नाविन्यपुर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादीचे आयोजन शासन आदेशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागा अंतर्गत विविध शाळा व महाविद्यालया मध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यानी या सर्व उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून तर पालिकेच्या शिक्षण विभागाने योग्य नियोजन करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन केले आहे.