महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

फुलविक्रेत्या महिलेला लुटणाऱ्या भामटे गजाआड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीमध्ये फुले आणण्यासाठी निघालेल्या हारविक्रेत्या महिलेला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने त्या महिलेचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल होताच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला बेड्या ठोकल्या आहेत.

मुख्य आरोपीसोबत त्याच्या अन्य तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणारी तक्रादार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते. 22 मार्च रोजी ही महिला डोंबिवली घरडा सर्कल येथून कल्याण एपीएमसी मार्केटच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. ही महिला घरडा सर्कल येथे एका रिक्षात बसली. या रिक्षात रिक्षा चालकासह अन्य तिघेजण बसले होते. या रिक्षाचालकाने न्यू गोविंदवाडी बीएसयूपी इमारती जवळ रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याचवेळी मागे बसलेल्या दोन अल्पवयीन मुलानी फिर्यादी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले.

या प्रकरणी महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात सदर गुन्हा उघडकीस आणण्यात डोंबिवली राम नगर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे व त्याच्या साथीदारांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.

Related Posts
Translate »