नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.मतदान करणे म्हणजे लोकशाही प्रती आदर राखून आपले कर्तव्य पार पाडणे होय. प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आडगाव खाकी उच्च प्राथमिक मराठी शाळा आडगाव खाकी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी आपल्या वाहनाने जिल्हा परिषद शाळा आडगाव खाकी येथे मतदाराचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडले. त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी लग्नासाठी रवाना झाले आहेत.