महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई /प्रतिनिधी – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे. त्या पार्श्वभूमी राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील सोशल मीडिया प्रभारी, महाराष्ट्र मिडिया समन्वयक, विभागीय व जिल्हा समन्वयक यांची नियुक्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे सोशल मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी दिली आहे. आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार हा आमचा निर्धार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

यावेळी सोशल मीडिया राज्य प्रभारी उदयराव घाटगे, सोशल मीडिया समन्वयक शशिकांत ससाणे व चिन्मय जोशी तर सोशल मीडिया सदस्य म्हणून प्रकाश चव्हाण, राहुल कोळसे, प्रशांत नवगिरे, निखिल राखोंडे, गौरव इंगळे, योगेश राठोड, गुरुप्रसाद सावंत यांचा समावेश आहे. तसेच, विभागीय सोशल मीडिया प्रसारक म्हणून मराठवाडा तून अशोक विधाते, उत्तर महाराष्ट्र प्रकाश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र सुशांत कांबळे, अमरावती विभाग गणेश कपाटे , नागपूर विभाग आकाश सुखदेवे , मुंबई विभागा करीता महेंद्र कणसे व रवींद्र रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय सोशल मीडिया समन्वयक म्हणून प्रकाश चव्हाण नाशिक, प्रवीण बेंद्रे अहमदनगर , शाहरुख पटवे धुळे , सचिन बनसोडे जळगाव , निखिल पवार नंदुरबार,जितेंद्र झाळखंडे अमरावती, स्वप्नील जोड अमरावती, प्रशांत भाटकर अकोला, अक्षय वानखाडे बुलढाणा, दुर्गादास चिन्ने यवतमाळ, रितेश देशमुख वाशिम, श्रीमती पूजा वाघमारे मुंबई, परशुराम वासवानी मुंबई ,श्रीमती अर्चना थोरात पाटील ठाणे ,विष्णू पाटील ठाणे, चेतन मानसा पालघर ,महेंद्र कणसे रायगड, गुरुप्रसाद गवळी रत्नागिरी ,महेश कांबळे सिंधुदुर्ग, शुभम क्षीरसागर पुणे ,निखिल देशमुख पिंपरी चिंचवड, विवेक पाटील सांगली, शुभम पाटील सांगली ,सचिन पाटील सातारा ,दगडू कांबळे सोलापूर, अभिजीत मोहिते कोल्हापूर, श्रीमती प्रिया राऊत नागपूर, हेमंत मलेवार भंडारा ,आकाश सुखदेवे चंद्रपूर, विनोद देवधरे गडचिरोली, अमर मेरगेवार गोंदिया, राहुल मून वर्धा, उमर शेख छत्रपती संभाजीनगर सचिन जाधव बीड, संतोष बधे बीड, सौरभ म्हस्के जालना, मोहन जाधव धाराशिव ,सत्यजित जोंधळे नांदेड, दीपक पाटील नांदेड, प्रवीण मुसांडे लातूर ,आतिष गरड परभणी, फिरोज शेख हिंगोली यांची निवड करण्यात आली आहे.

बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी जयंत देशमुख यांनी सांगितले की, आम्ही सर्व सोशल मीडिया नियुक्ती केली आहे.आता प्रत्येक घराघरात पक्षाचे नाव पोहोचले आहे. यासाठी घराघरात नाव पोहोचले की तेलंगणाचे विकसीत मॉडेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आठ ते नऊ वर्षांत जे काम केले आहे त्यांची चर्चा महाराष्ट्रात आहे.येत्या काळात सोशल मीडिया माध्यमातून आम्ही महाराष्ट्र बरोबर संपूर्ण देशभर जाळे तयार करून त्याचप्रमाणे देशात सरकार बनविण्यासाठी तयार होत आहे असे देशमुख यांनी सांगितले

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »