महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती

नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – सध्या जगभरात मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला जात असून त्यानिमित्ताने कल्याण पहिल्यांदाच फ्लॅश मॉम आणि रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आले. कल्याणातील केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

कल्याण पश्चिम येथील केंब्रिया इंटरनॅशनलपासून सुरू झालेली ही रॅली खडकपाडा मेन रोड,अमृत पार्क, वसंत व्हॅली, गोदरेज हिलमार्गे साई चौकात समाप्त झाली. त्यानंतर या रॅलीमध्ये उपस्थित असणाऱ्या केंब्रिया कॉलेजच्या सायक्लॉजी विभागातील 11 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केल्याचे दिसून आले. मानसिक आरोग्याबाबत विविध सकारात्मक संदेश देणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते.

आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असलो तरी त्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे त्याला तितके महत्त्व दिले जात नाही. आपल्या शरीराला ताप आला तर आपण लगेचच डॉक्टरकडे जातो. परंतु मनाला त्रास होत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही गोष्ट बदलण्यासाठी आम्ही आज हा उपक्रम राबवल्याची माहिती शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सी एम डी बिपिन पोटे यांनी दिली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजच्या मुख्याध्यापिका हिना फाळके, सायक्लॉजी विभाग प्रमुख क्रिपा राठोड, भूषण कुटे, अमोल शिंदे यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य लाभले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »