महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य ताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. 2022-23 या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

यामध्ये राज्यस्तरीय कायाकल्प प्रथम क्रमांक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचसोबत जिल्ह्यात शेणवा, शिरोशी, धसई, अनगाव, खडवली या 5 प्राथमिक आरोग्य केंद्राना उत्तेजनार्थ प्रत्येकी रक्कम रुपये 50 हजाराचे पारितोषिक मिळाले आहे.

केंद्र शासनाच्या सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना द्वारे गरोदर महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे कामकाज करण्यात येते. यावर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, शहापूर तालुक्यातील शेणवा, मुरबाड तालुक्यातील धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात.

वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार जाहीर आला असून या पुरस्काराची रक्कम 2 लाख रुपये आहे. इतर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, शहापूर तालुक्यातील शेणवा, मुरबाड तालुक्यातील धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. त्याच बरोबर पुरस्कार मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक करत त्यांनी अभिनंदन केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »