नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाच्या मूर्तीची उंची मर्यादेची अट शासनाने काढल्याने गणेश मंडळा कडून दहा फुटापासून उंच मूर्तींची मागणी केली जाते. चोपडा शहरामध्ये पालीवार आर्ट चे अरविंद पालीवाल यांनी सांगितले की बाहेर गावाहून आम्ही कच्चामाल आणत असतो. त्या कच्च्या माला पासुन मुर्ती तयार करण्यासाठी आम्हाला दोन अडीच महिन्या पुर्वीपासून कामाला लागावे लागते. आता मूर्ती फिनिशिंगचं काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
यावर्षी गणेश मूर्तींमध्ये दीडपटीने किंमत वाढ झालेली आहे. आमच्याकडे दहा फुटापर्यंत मूर्ती आहेत व मंडळाकडून बुकिंग सुरू आहे गणेशोत्सवाच्या आधी मंडळांना गणेश मूर्ती देण्यासाठी कारागीर काम करण्यात मग्न आहेत. काही दिवसात ते पूर्ण होईल असे पालीवाल आर्ट चे अरविंद पालिवाल यांनी सांगितले.